आध्यात्मिक विकास परिषद
१३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
आध्यात्मिक विकास परिषद ची स्थापना 12 एप्रिल 2011 रोजी श्रीराम नवमी या शुभ दिवशी स्थापना झाली, आपली हिंदू धर्म संस्कृती ही भक्ती प्रधान असल्याकारणाने आपल्या पुढील पिढीला अध्यात्म ज्ञानाचा व संस्काराचा वसा लाभावा हा आमचा प्रयत्न आणि हाच संकल्प घेऊन हिंदू धर्मातील ऋषीमुनी, साधुसंत यांचे ग्रंथ साहित्य व ज्ञानाचा आधार घेऊन आपली खरी धर्म संस्कृती व त्यातील विज्ञान जगभरात पोहोचण्याचा संकल्प घेऊन आज लहान तरुण गटातील मुल व्यसनाधीन तथा अधर्माच्या बाजून बरबाद होत चालली आहे. परिणामी कुटुंबाचे समाजाचे देशाचे तथा धर्मचि नुकसान होत चालले आहे. आपल्या देशाचा धर्माचा कणा म्हणजे हे तरुण पिढी आणि याच तरुण पिढीला अध्यात्मिक ज्ञान धर्म संस्कार वैदिक ज्ञान पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. . आध्यात्मिक विकास परिषद ही वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मिक शिक्षण देणारी शिक्षण संस्था आहे. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना कीर्तन, प्रवचन , आणि वारकरी परंपरेतील अभ्यासाचे धडे दिले जातात . अध्यात्मिक भजन , कीर्तन , प्रवचन, कथा , गायन , ग्रंथ पारायण , वादन – टाळ , पखवाज , पेटी , तबला प्रशिक्षण सेवा आध्यात्मिक विकास परिषदेत दररोज वारकरी शिक्षण संस्थेत दिले जाते
अध्यात्मिक विकास परिषद सेवा
आध्यात्मिक विकास परिषदेचे प्रकल्प

ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था तथा अध्यात्मिक गुरुकुल
वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी सांप्रदायिक चालीतील गायन प्रशिक्षण देऊन उत्तम दर्जाचे हरिपाठ , भजन , कीर्तन यामधील गायन प्रशिक्षण देण्यात येते , वादनामध्ये तबला , मृदूंग – पखवाज , टाळ , विना , चिपळ्या यांचे ताल सुरात गायन व वादन प्रशिक्षण देण्यात येते .

वात्सल्यधाम गोशाळा तथा पंचगव्य चिकित्सा.
गोशाळा म्हणजे गायींचे संवर्धन, संरक्षण व संगोपन करण्यासाठी स्थापन केलेली संस्था. येथे गायींना सुरक्षित आसरा, अन्न, पाणी, वैद्यकीय सेवा व योग्य देखभाल दिली जाते. गोशाळा धार्मिक, सामाजिक, कृषी व पर्यावरणीय दृष्टीने कार्यरत आहेत. गोशाळा प्रामुख्याने गायीचे दूध , तूप , गोमूत्र , गोवऱ्या , सर्वांना वाजवी दरात पुरवण्याचे कार्य सातत्याने करत आहे .

आरोग्य रक्षा तथा वात्सल्य आयुर्वेद.
आयुर्वेदिक साहित्य , सेवा , उत्पादने , प्रॉडक्ट्स , जे शारीरिक मानसिक , बौद्धिक विकासासाठी व सुदृढतेसाठी दैनंदिन जीवनात रोज वापरून आपले जीवन व जीवन ऊर्जा उंचावण्यासाठी व सातत्यपूर्ण उत्तम कार्य करण्यासाठी व निरोगी सर्वंकुशल जीवनासाठी सातत्याने कार्य केले जात आहे . आरोग्यरक्षाची विविध आयुर्वेदिक उत्पादने सर्वांसाठी माफक दारात उपलब्ध आहेत . आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती .

योग, प्राणायाम आणि ध्यान प्रशिक्षण सेवा
योग, प्राणायाम आणि ध्यान हे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग मानले जातात. या प्रशिक्षण सेवेद्वारे लोकांना योग्य पद्धतीने व्यायाम, श्वसन तंत्र, आणि मनन-ध्यानाचे मार्गदर्शन दिले जाते.आयुर्वेदिक शुद्ध शाकाहारी आहार व उत्तम पद्धतीने केल्या जाणाऱ्या योग , प्राणायाम , ध्यान , धारणा यांचा रोज सातत्याने व नित्यनियमाने केलेल्या सरावाने उत्तम सुदृढ शरीर , तल्लख बुद्धी व मानसिक समाधान मिळते .
आध्यात्मिक विकास परिषदेचे प्रकल्प
ज्ञानलीला साप्ताहिक वृत्तपत्र

ज्ञानलीला साप्ताहिक वृत्तपत्र मुख्य विषय
मुख्य विषय / स्तंभ (Columns)
🟠 1) समाज आणि संस्कृती
भारतीय सण, उत्सवाचे महत्त्व
लोकसंस्कृती व परंपरा
प्रेरणादायी कथा
🟢 2) आरोग्य आणि आयुर्वेद
योग व प्राणायाम मार्गदर्शन
घरगुती उपाय
आयुर्वेदिक आरोग्य टिप्स
पंचगव्योपचार, नैसर्गिक आरोग्य
🔵 3) शेती व ग्रामविकास
सेंद्रिय शेती
पशुपालन
गोशाळा व गौसंवर्धन
कृषी तंत्रज्ञान
🟣 4) महिला सक्षमीकरण
महिलांसाठी कौशल्य विकास
उद्योजकता
स्व-सुरक्षा माहिती
🟡 5) युवा विशेष
करिअर मार्गदर्शन
स्पर्धा परीक्षा
व्यक्तिमत्त्व विकास
🟤 6) पर्यावरण संरक्षण
वृक्षसंवर्धन
जलसंवर्धन
स्वच्छता अभियान
⚫ 7) आध्यात्मिक मार्गदर्शन
धर्मग्रंथांची सोपी व्याख्या
संत विचार
साधना, ध्यान, नैतिक मूल्ये

ज्ञानलीला साप्ताहिक वृत्तपत्र सामाजिक कार्य
ज्ञानलीला साप्ताहिक हे समाजातील सर्वांगीण विकास, संस्कार, अध्यात्म, ज्ञानप्रसार आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्यासाठी प्रकाशित होणारे एक प्रभावी आणि उपयुक्त मराठी साप्ताहिक आहे.
या वृत्तपत्राचे मुख्य उद्दिष्ट वाचकांना निरोगी, संस्कारित, सजग आणि विचारप्रवर्तक समाजाकडे घेऊन जाणे आहे.
वृत्तपत्राचे उद्दिष्ट
✔ 1) ज्ञानाचा प्रसार
वाचकांना नवी विचारसरणी, नवीन घडामोडी आणि सकारात्मक ज्ञान उपलब्ध करून देणे.
✔ 2) संस्कार व अध्यात्म जागृती
भारतीय संस्कृती, धर्म, अध्यात्म, योग, प्राणायाम, ध्यान याबाबत योग्य मार्गदर्शन.
✔ 3) समाजातील सकारात्मकता वाढविणे
सकारात्मक बातम्या, प्रेरणादायी कथा व व्यक्तिमत्त्वांचे अनुभव देऊन समाजात चांगुलपणा वाढवणे.
✔ 4) शेती, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यावरण

ज्ञानलीला साप्ताहिक वृत्तपत्र कार्यप्रणाली
सर्व क्षेत्रातील सर्व विभातील बातम्या साप्ताहिक ज्ञान लीला या साप्ताहिक वृत्तपत्रातून सर्वांना पोहचवण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे
अध्यात्म
आयुर्वेदिक
आरोग्य
उत्सव
खेळ
ज्ञानलीला ई-पेपर
तंत्रज्ञान
देश
नोकरी
पुणे
प्रवास
फिटनेस
फुटबॉल
फॅशन
मनोरंजन
महाराष्ट्र
मुंबई
योगा
राजकीय
विज्ञान
विदेश
व्यवसाय
शैक्षणिक
संपादकीय
सामाजिक
सांस्कृतिक
⭐ समाजासाठी महत्त्व :
ज्ञानलीला साप्ताहिक हे समाजात निरोगी विचार, संस्कार, व सकारात्मक ऊर्जा पसरविण्याचे कार्य करते.
हे एक परिवर्तनकारी आणि मार्गदर्शक माध्यम असून व्यक्ती ते समाज परिवर्तन साधण्याचे सामर्थ्य असलेले मंच आहे.