आध्यात्मिक विकास परिषद

आध्यात्मिक विकास परिषद

अध्यात्मिक विकास परिषद

प्रकल्प

ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था तथा अध्यात्मिक गुरुकुल

आध्यात्मिक विकास परिषद ही वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मिक शिक्षण देणारी शिक्षण संस्था आहे.  या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना कीर्तन, प्रवचन ,  आणि वारकरी परंपरेतील अभ्यासाचे धडे दिले जातात .  अध्यात्मिक भजन , कीर्तन , प्रवचन, कथा , गायन , ग्रंथ पारायण , वादन - टाळ , पखवाज , पेटी , तबला प्रशिक्षण सेवा आध्यात्मिक विकास परिषदेत दररोज वारकरी शिक्षण संस्थेत दिले जाते 

वात्सल्यधाम गोशाळा व पंचगव्य चिकित्सा.

गोशाळा म्हणजे गायींचे संरक्षण, पालन-पोषण, सेवा आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेले केंद्र. भारतीय संस्कृतीत गाय ही धन, अन्न, औषध, शेती आणि अध्यात्म यांचा आधार मानली गेली आहे. गोशाळेचे प्रमुख उद्देश छत्रच्छाया व संरक्षण आजारी, निराधार, जखमी, अपघातग्रस्त किंवा सोडून दिलेल्या गायींचे संरक्षण. दुग्ध उत्पादन सुरक्षित, रसायनमुक्त दूध, तूप, दही, ताक. पंचगव्य आधारित औषधे व उत्पादने गोमूत्र अर्क, गोमूत्र-गिलोय, अर्क, धूप इत्यादी. शेतीसाठी नैसर्गिक खत गोबर खत, जीवामृत, घनजिवामृत, वर्मी-कंपोस्ट.

आरोग्य रक्षा तथा वात्सल्य आयुर्वेद.

आयुर्वेदिक साहित्य , सेवा , उत्पादने , प्रॉडक्ट्स , जे शारीरिक मानसिक , बौद्धिक विकासासाठी व सुदृढतेसाठी दैनंदिन जीवनात रोज वापरून आपले जीवन व जीवन ऊर्जा उंचावण्यासाठी व सातत्यपूर्ण उत्तम कार्य करण्यासाठी व निरोगी सर्वंकुशल जीवनासाठी सातत्याने कार्य केले जात आहे

ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था तथा अध्यात्मिक गुरुकुल

आध्यात्मिक विकास परिषद ची स्थापना 12 एप्रिल 2011 रोजी श्रीराम नवमी या शुभ दिवशी स्थापना झाली, आपली हिंदू धर्म संस्कृती ही भक्ती प्रधान असल्याकारणाने आपल्या पुढील पिढीला अध्यात्म ज्ञानाचा व संस्काराचा वसा लाभावा हा आमचा प्रयत्न आणि हाच संकल्प घेऊन हिंदू धर्मातील ऋषीमुनी, साधुसंत यांचे ग्रंथ साहित्य व ज्ञानाचा आधार घेऊन आपली खरी धर्म संस्कृती व त्यातील विज्ञान जगभरात पोहोचण्याचा संकल्प घेऊन आज लहान तरुण गटातील मुल व्यसनाधीन तथा अधर्माच्या बाजून बरबाद होत चालली आहे. परिणामी कुटुंबाचे समाजाचे देशाचे तथा धर्मचि नुकसान होत चालले आहे. आपल्या देशाचा धर्माचा कणा म्हणजे हे तरुण पिढी आणि याच तरुण पिढीला अध्यात्मिक ज्ञान धर्म संस्कार वैदिक ज्ञान पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. . आध्यात्मिक विकास परिषद ही वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मिक शिक्षण देणारी शिक्षण संस्था आहे.  या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना कीर्तन, प्रवचन ,  आणि वारकरी परंपरेतील अभ्यासाचे धडे दिले जातात .  अध्यात्मिक भजन , कीर्तन , प्रवचन, कथा , गायन , ग्रंथ पारायण , वादन - टाळ , पखवाज , पेटी , तबला प्रशिक्षण सेवा आध्यात्मिक विकास परिषदेत दररोज वारकरी शिक्षण संस्थेत दिले जाते 

योग, प्राणायाम आणि ध्यान

योग हा शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्याचा शास्त्रीय मार्ग आहे. संस्कृतमध्ये "युज" म्हणजे जोडणे. योग शरीराला निरोगी, मनाला शांत आणि जीवनाला संतुलित बनवतो. ✔ योगाचे प्रमुख प्रकार हठयोग – शारीरिक आसने (Asanas) व श्वसन नियंत्रण अष्टांग योग – आठ अंगांचा शिस्तबद्ध योग मार्ग कुंडलिनी योग – ऊर्जा जागृतीचा साधना मार्ग सूर्यनमस्कार – शरीराला संपूर्ण व्यायाम देणारा योग क्रम भक्ती योग / कर्म योग / ज्ञान योग – जीवनशैली स्वरूपातील योग ✔ योगाचे फायदे शरीर लवचिक होते स्नायू आणि हाडे मजबूत राहतात पचनशक्ती वाढते हार्मोन्स संतुलित राहतात मधुमेह, थायरॉईड, बीपी नियंत्रणात येण्यास मदत तणाव, चिंता, अनिद्रा कमी होते एकाग्रता वाढते

ज्ञानलीला साप्ताहिक वृत्तपत्र

मुख्य विषय / स्तंभ (Columns) 🟠 1) समाज आणि संस्कृती भारतीय सण, उत्सवाचे महत्त्व लोकसंस्कृती व परंपरा प्रेरणादायी कथा 🟢 2) आरोग्य आणि आयुर्वेद योग व प्राणायाम मार्गदर्शन घरगुती उपाय आयुर्वेदिक आरोग्य टिप्स पंचगव्योपचार, नैसर्गिक आरोग्य 🔵 3) शेती व ग्रामविकास सेंद्रिय शेती पशुपालन गोशाळा व गौसंवर्धन कृषी तंत्रज्ञान 🟣 4) महिला सक्षमीकरण महिलांसाठी कौशल्य विकास उद्योजकता स्व-सुरक्षा माहिती 🟡 5) युवा विशेष करिअर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्त्व विकास 🟤 6) पर्यावरण संरक्षण वृक्षसंवर्धन जलसंवर्धन स्वच्छता अभियान ⚫ 7) आध्यात्मिक मार्गदर्शन धर्मग्रंथांची सोपी व्याख्या संत विचार साधना, ध्यान, नैतिक मूल्ये

अध्यात्मिक विकास परिषद

समृद्ध जीवनाचा मार्ग

अध्यात्मिक विकास परिषद

आध्यात्मिक विकास परिषदेचे प्रकल्प

Scroll to Top